मोबाईल स्क्रीन गार्डमुळे जीव गेला, सांगलीतील मोबाईल दुकानदाराचा भयंकर मृत्यू, नेमकं काय घडलं?


सांगली : सांगली एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड वादातून एका मोबाईल दुकानदार तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

सध्या सर्वच तरुणांकडे मोबाईल असतो. मोबाईलचा स्क्रीन गार्ड हे मोबाईलचा संरक्षण करतो. मात्र, याच मोबाईल स्क्रीनमुळे एकाच जीव गेला आहे. सांगलीतल्या विपुल गोस्वामी या मोबाईल दुकानदाराचा स्क्रीन गार्ड 50 रुपयांना देत नसल्याने खून करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी की, विपुल याचे सांगलीत विपुल भैरवनाथ मोबाईल शॉपी आहे. या दुकानात मोबाईलचे वेगवेगळे साहित्य विक्री करायचा. याच मोबाईल दुकानात चार अल्पवयीन तरुण मोबाईलचा स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी आहे होते.

नंतर त्यांनी मोबाईलचा स्क्रीन गार्डन दाखवण्यासाठी सांगितले. विपुलने मोबाईलचा स्क्रीन गार्ड दाखवले, मात्र स्क्रीन गार्ड किंमत ऐकल्यावर अल्पवयीन तरुणांना हटकले, इतर ठिकाणी पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड मिळत असताना शंभर रुपये किंमत कशी? असं एकाने म्हटले.

यातून नंतर वाद, शिवीगाळ सुरू झाली. नंतर चौघांनी आपल्या जवळ असणारी धारदार शस्त्र काढली आणि मोबाईल दुकानदार असणाऱ्या विपुलवर वार करण्यात आले, ज्यामध्ये विपुल गोस्वामी याचा जागीच मृत्यू झाला, यामुळे मोठी खळबळ उडाली.

भर दिवसा ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस पथकाने याबाबत माहिती घेत गतीने तपास सुरू केला आणि काही वेळातच या त्या संशयित तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात देखील घेण्यात आला आहे. केवळ पन्नास रुपयेचा मोबाईल स्क्रीन गार्डमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!