अपात्र आमदार प्रकरणी आमदारांनी दिली उत्तरे, आता विधानसभा अध्यक्ष निर्णय घेयला मोकळे..


मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. राहुल नार्वेकर यांनी आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा वेळ दिला होता.

त्यानंतर आता दोन्ही गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर दिल्याची माहिती मिळत आहे.

दोन्ही गटाकडून वेगवेगळा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

ठाकरे गटाने नेमके काय उत्तर दाखल केले?

ठाकरे गटाच्या सर्व १४ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर पाठवले आहे. आम्ही १४ आमदार खरी शिवसेना आहोत. ठाकरे गटाकडून २६२ पानी उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलं आहे.

आम्ही राजकीय पक्ष असल्याचे सांगत शिवसेनेची घटना आणि व्हीपची कॉपी ठाकरे गटाने पाठवली आहे. २०१८च्या एडीएम बैठकीत उद्धव ठाकरे हेच प्रमुख होते, असे उत्तर ठाकरे गटाने दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह इतर ४० आमदारांनी पक्षाच्या घटनेचे उल्लंघन केले आहे. पक्षाची घटना मोडून शिंदे गटाने अनधिकृतरित्या पक्षावर दावा केला. २०१८ मध्ये सुनील प्रभूंचा व्हीप लागू होता. तसेच राजकीय पक्षाचाच व्हीप लागू होणार कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालात तसा उल्लेख आहे, असे स्पष्ट उत्तर ठाकरे गटाच्या आमदारांनी दिले आहे.

शिंदे गटाने नेमके काय उत्तर दाखल केले?

विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या १४ आणि शिंदे गटाच्या ४० आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसला शिंदे गटातील १६ आमदारांनी वेगळा रिप्लाय फाईल केलाय. तसेच उर्वरित २४ आमदारांनी एकत्र रिप्लाय फाईल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्हिपबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आमचाच व्हिप हा निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे आणि त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे यात नमूद आहे. त्यासोबतच शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिल्याने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा देखील करण्यात आलेला आहे. या रिप्लायासोबत त्यांनी शपथपत्र देखील जोडलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!