शहाजीबापूंचा डान्स एकदम ओकेच ! धनुष्यबाण मिळताच केला डीजेवर जल्लोष…!

पंढरपूर : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केला. शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी निकाल जाहीर होताच जल्लोष केला आहे. पंढरपुरात शिंदे गटाच्या वतीने डीजे लावत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरला.
आमदार शहाजीबापूंनी आनंदाच्या भरात डान्स पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आला आणि जल्लोषाचे वातावरण पंढरपुरात पाहायला मिळाले. शिंदे गटाला शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर शहाजीबापूंच्या महुद या मूळगावी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ठाकरे गटाची आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी होती. मात्र तसे झाले नाही. त्यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली होती.