आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा ‘कर्तव्याच्या कृतीने आकाश ठेंगणे’ ; जिल्ह्याबाहेरील गरजूवंत रुग्णाच्या मदतीला धावले …..

उरुळीकांचन : ‘कर्तव्यात अकाश ठेंगणे’ असा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील अकलूज तालुक्यातील थोरात कुटुंबियाला आला असून मेंदूशी रक्तपुरवठा करणारी नस निकामी झालेल्या कुटूंबियाला एक लाखाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे१लाखाची
मदत करुन शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नातून झाला आहे.
अर्थिक परिस्थितीशी मुकाबला करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी ज्ञानेश्वर थोरात यांची मेंदूला पुरवठा करणारी नस निकामी झाल्याने अशा आवस्थेत लोणी काळभोर( ता.हवेली)येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या थोरात कुटूंबियात या शस्त्रक्रियेवरील खर्च म्हणून एकूण झालेल्या मदतीत शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके हे मदतीला धावले आहे.

अर्थिक अडचणीत असलेल्या या कुटूंबियाला स्थानिक पातळीवर अर्थिक स्वरुपाची चणचण असल्याची स्थिती लक्षात घेता आमदार महोदय यांनी क्षणाचाही विलंब न घेता हे रुग्ण जिल्ह्याबाहेरील असतानाही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख रुपये खर्च शस्त्रक्रियेसाठी प्रस्ताव पाठवून प्रस्तावाचा पाठपुरावा करुन निधी मंजुर केला आहे.


त्यामुळे थोरात कुटूंबियाला या बहुमुल्य मदतीने मोठा आधार मिळाला आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या एका जिल्ह्याबाहेरील कुटूंबियाला अर्थिक मदत करुन केलेल्या प्रयत्नाने एका सामान्य रुग्णाला अर्थिक आधार मिळाला आहे. आ. कटके यांची आरोग्य विषयक मदतीची यंत्रणा अतिशय प्रभावीपणे मतदारसंघात कार्यरत असून विविध रुग्णांना अर्थसहाय्य मिळून त्यांची कृती सामान्यांच्या चर्चेत आहे.