MLA Disqualification Case : Breaking News : शिंदेंचे १६ आमदार पात्र, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहणार…

MLA Disqualification Case : राज्याच्या सत्तासंघर्षामध्ये सर्वात मोठा निकाल हाती आला असून ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे.

त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व १६ आमदार पात्र ठरवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. MLA Disqualification Case
शिवसेनेच्या १६ पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीदेखील विधानसभा अध्यक्षांवी वैध ठरवली आहे.

Views:
[jp_post_view]