पुण्यात नवीन महानगरपालिका झाली तर ‘या’ ठिकाणी करा, आमदार चेतन तुपे यांची मागणी
पुणे : पुणे परिसरात तीन महापालिका होणारच असून, जनमत घेऊन स्वतंत्र महापालिका करणे योग्य ठरेल, असे उत्तर आमदार चेतन तुपे यांनी दिले.
पुणे महापालिकेत असमतोल विकास झाला असून, चांगला प्रकल्प आला, की तो शहराच्या पश्चिमेला आणि कचर्याचा प्रकल्प आला, की तो पूर्वेला आणायचा! हडपसरच्या नागरिकांना महापालिकेत येण्याचे नसेल, तर बाकीच्या गावांच्या ग्रामपंचायती राहिलेल्याच बर्या.
सर्वांचा विकास होण्यासाठी हडपसरसह नवी महापालिका करावी लागेल,’ असे मत आमदार चेतन तुपे यांनी केले. हडपसर परिसर पुणे महापालिकेत राहिल्यासच जागतिक पातळीवरील पुण्याच्या नावलौकिकाचा फायदा मिळेल.
चेतन तुपे म्हणाले, शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना डेक्कनसारख्या सुविधा कधी मिळणार? त्यासाठी काय करता येईल की, पुण्याचा कचरा आम्ही अंगावर घ्यायचा आणि पाण्यासाठी वणवण फिरायचे. महापालिका व्हावी किंवा नाही, याबाबत मतमतांतरे आहेत, पण विकासासाठी सर्वांची मूठ आवळली गेली पाहिजे आणि हडपसरच्या विकासासाठी एकवटले पाहिजे.