चार दिवसांपासून बेपत्ता, कुटुंबाकडून शोध, पाचव्या दिवशी खाणीत आढळले शरीराचे पाच तुकडे, घटनेने पुणे हादरलं..

पिंपरी चिंचवड : परिसरातील भोसरी भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भोसरी भागात असणाऱ्या मोशी येथील गव्हाणे वस्तीमध्ये राहणाऱ्या सिद्धाराम प्रभू ढाले या बुलडोझर चालकाचा खून करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला आहे.
त्यांच्या शरीराचे पाच तुकडे केले आहेत. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिद्धाराम यांचा मृतदेह मोशी येथील कानिफनाथ मंदिरासमोरील खडी मशिन खाणीत आढळून आला. सिद्धाराम २९ मार्चला सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ते सापडले नाहीत.
याबाबत पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. नंतर मोशीतील खाणीत स्थानिकांना सिद्धाराम यांचे धड आढळले. तिथे त्यांचा मोबाईलही सापडल्याने ओळख पटली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांच्या शरीराचे तुकडे केले. चेहरा, डोके, डावा पाय आणि दोन्ही हात वेगळे केले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सिद्धाराम ढाले यांची हत्या नेमकी कुणी आणि का केली असावी? याबाबत तपास सुरु आहे. हत्या करणाऱ्याच्या मनात सिद्धाराम याच्या मनात इतका द्वेष का होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पोलिसांनी आता सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणी सिद्धाराम यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सध्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये देखील शीर धडा वेगळे करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता मोशी भागात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. अशा घटना सध्या पुणे शहर परिसरात वाढत आहेत.