कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी ३ अल्पवयीन मुलासह ३६ जणांना अटक; पोलिस बंदोबस्तात वाढ

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंद पुकारला.

असे असताना कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. यामुळे ३६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
देशात पुन्हा उडाली खळबळ! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करत मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, आणि

सध्या परिस्थिती आटोक्यात आली आहे. ४ सीआरपीएफ कंपन्या, ३०० पोलिस कॉन्स्टेबल्स आणि ६० अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले, स्टेटस ठेवणारे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.
बैलाने काढला सगळ्या गावकऱ्यांचा घाम! घराच्या छतावर चढला बैल अन्..
यामध्ये एकच स्टेटसचं अन्य सर्वांनी कॉपी केलं होतं. स्टेटस ठेवणारे सर्व कॉलेजचे विद्यार्थी होते. काल याठिकाणी इंटरनेट देखील बंद करण्यात आले होते.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल; जाणून घ्या..
दरम्यान, आज दीड हजार होमगार्ड बोलावले आहेत. एसआरपीएफच्या २ तुकड्या, सांगली साताऱ्यातील १० अधिकारी आणि १०० पोलीस बोलावले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोलिंग सुरू आहे.
इचलकरंजी, आजरा येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. आज तणावपूर्ण शांतता आहे. वरणगे पाडळीतही प्रार्थना स्थळी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.