देवेंद्र फडणवीस शिरूरला येणार! जयश्री पलांडे यांचे ‘ते’ स्वप्न होणार पूर्ण…!

शिरूर : पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे यांनी त्यांच्या समर्थकानसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
शिरुर तालूक्यातील जवळपास १०० ते १५० शिवसेना उध्दव ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जयश्री पलांडे यांच्या भाजपा घरवापसीमुळे आता शिरूरमध्ये भाजपचा आमदार निवडून येण्याबाबत आम्ही निश्चिन्त झालो असून, लवकरच पक्षाचा भव्य मेळावा शिरूरमध्ये घेण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. दरम्यान, कै.रामराव गेनूजी पलांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे उद्घाटन रखडले आहे. भाजपच्या बड्या नेत्याला याच्या उद्घाटनासाठी आणण्याचे त्यांचे स्वप्न होते.
आता त्यांचे स्वप्न साकार होणार आहे. आता यासाठी देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कामाला लागण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. यामुळे शिरूरमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.