पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे खंडणीसाठी अपहरण; लोणीकंदच्या माजी ग्रा.प. सदस्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…


पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात मेट्रो प्रकल्पाशी संबंधित एका ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी “खडी क्रशर प्लांटसाठी जागा दाखवतो” असे सांगून ठेकेदाराला बोलावले आणि नंतर कारमधून त्याला एका ठिकाणी नेऊन जबरदस्तीने ताब्यात घेतले.

तेथे त्याला मारहाण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात आर्थिक वादाचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.

आर्थिक वादातून हा प्रकार घडला असून याप्रकरणी खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत.

याप्रकरणी सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रूपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता), प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मेट्रोतील ठेकेदाराने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या ठेकेदाराचे अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गहुंजे भागात वास्तव्यास असलेले ४० वर्षीय फिर्यादी ठेकेदार मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचे आहेत.आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख झाली होती.

ठेकेदाराने झुरुंगेकडून खडी खरेदी केली होती. आरोपींनी खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करत ठेकेदाराचे अपहरण केले, तसेच त्यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!