हवामान खात्याचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेड अलर्ट, पुढील तीन दिवस अतिशय महत्वाचे, जाणून घ्या…


पुणे : राज्यात पावसाने यंदा मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आज सकाळपासून मुंबई आणि त्याच्या उपनगरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच वर्धा, नाशिक, अहमदनगर, घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, नागपूर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज दिवसभर दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण भागात पावसाची तीव्रता थोडी कमी होण्याची अपेक्षा आहे. गुरुवार मध्यरात्रीपासून शुक्रवार सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या.

       

दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत पावसाची अंदाज देत परिणामी वाहतुकीला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पुढील दोन दिवस महत्वाचे असणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत समुद्राच्या पातळीत चढ-उतार होत असल्याने मच्छिमारांनाही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यास सांगितले आहे. याबाबत शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!