महाराष्ट्रात पुन्हा मेगा भरती!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, तरुणांसाठी आनंदाची बातमी…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने याबाबत आश्वासन दिले होते. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात लवकरच मेगा भरती होणार आहे.

आता सर्व विभागांना १५० दिवसांत उद्दिष्टपूर्तीचे आदेश देण्यात आले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. सफाई कामगारांच्या पदांवर वारसा हक्काने भरती केली जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच जात वैधता प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पूर्वी जाहीर केलेल्या ७५ हजार पदभरती कार्यक्रमाअंतर्गत एक लाखांहून अधिक भरती पूर्ण झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात अजून भरती होणार आहे.

यामध्ये आता अनुसूचित जमाती प्रवर्गातील ६,८६० पदांवर कार्यरत कर्मचारी जात वैधता सादर न करू शकल्यामुळे ही पदे अधिसंख्य मानण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांना पदावरून हटवले जाणार नाही, मात्र त्यांना बढती मिळणार नाही. असेही सांगितले जात आहे. रिक्त झालेल्या १३४३ पदांवर भरती पूर्ण. उर्वरित भरती प्रक्रिया सुरू आहे.

राज्यात पोलीस भरती देखील होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच सफाई कामगारांच्या पदांवरील न्यायालयीन स्थगिती हटली, आता वारसा हक्काने भरती शक्य होणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत तरुणांना दिलासा मिळणार आहे, असेही सांगितले जात आहे.