Mauli Katke : पदार्पणातच सभागृहात दाखविली अभ्यासू बाण्याची झलक! आमदार ज्ञानेश्वर कटकेंची पहिल्याच सत्रात शिरुर -हवेलीच्या महत्वाचा प्रश्नांनी कार्यकिर्दीला दमदार सुरुवात…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : जिल्ह्यात आपल्या ऐतिहासिक विजयाने सर्वात अधिक चर्चेत असलेल्या शिरुर -हवेली विधानसभा मतदारसंघातील आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपल्या पहिल्याच अधिवेशनात शिरुर-हवेलीत मतदारसंघातील वाघोली ते शिरुर व हडपसर ते उरुळीकांचन पर्यंतच्या वाहतुक कोंडीच्या अनेक वर्षांच्या समस्येला थेट हात घातल्याने माऊली कटकेंच्या सभागृहातील पदार्पणातच केलेल्या अभ्यासू मुद्दांनी मतदारसंघात जनतेची शाबासकी मिळविली असून त्यांच्या अभ्यासू नेतृत्व कौशल्याने मतदारसंघातील वाहतुकीची बिकट समस्या सोडविली जावी म्हणून नागरीकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशन सत्रात राज्यातील बांधकाम विभागाच्या चर्चेत शिरुर-हवेली मतदारसंघात स्थानिक मुद्दे विचारात घेऊन आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी मतदारसंघात सर्वात जिकीरीचा वाहतुक कोंडीचा प्रश्न मांडून या समस्येवर तोंड फोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कार्यकिर्दीत पहिला मुद्दा विधानसभेत सभेत मांडताना त्यांनी वाहतुक कोडींचा प्रश्न सभागृहात व राज्य सरकार समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पहिल्याच मांडणीत त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधून हा मुद्दा सोडविण्यासाठी राज्य सरकारची कटिबद्ध महत्त्वाची आहे हे अधोरेखित केले आहे. Mauli Katke

कटके यांनी आज सभागृहात मतदारसंघातील मुद्दांवर चर्चा करीत वाघोली शहरातील वाहतुक कोंडी व या वाहतुक कोंडीने या महामार्गावरील निर्माण होत असलेल्या समस्येवर लक्ष वेधले. या महामार्गावर वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अनेक उपाय झाले मात्र वाहतुक कोंडी समस्या सुटत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी हडपसर ते उरुळीकांचन पर्यंत सतत निर्माण होणाऱ्या वाहतुक कोंडीच्या समस्येवर हात घालून समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

या मुद्दांसहीत शिरुर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्लांनी एका निष्पाप मुलाचा जीव गमाविल्याची कैफियत सभागृहात मांडून या बिबट्यांच्या वाढत्या प्रजनाने ग्रामीण भागाचे वातावरण भियभित झाले असून शेतकऱ्यांच्या जिवाला या हिंस्त्र प्राण्यामुळे धोका असल्याने बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

माऊली कटकेंच्या रुपाने शिरुर -हवेली मतदारसंघाला नव्या दमाचा आमदार लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून शिरुर -हवेली मतदारसंघातील अनेक वर्षे भेडसवारे सिंचन, आरोग्य, पायाभूत सुविधा याबरोबरच सहकारातील घोडगंगा, यशवंत सहकारी साखर कारखाने सुरू करण्यासह पूर्व हवेलीत पालिका स्तरावर विकास साधण्याचे दिवा स्वप्न त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळे भविष्यकाळात मोठे आव्हान ते या प्रश्नांना कसे सामोरे जातात म्हणून त्यांच्या अभ्यासूबाणाची झलक मतदारसंघातील पाहणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!