मोठी बातमी ! समृद्धी महामार्गावर अपघाताचे पुन्हा तांडव ! १२ जागीच ठार तर २० जखमी !!

Accident On Samriddhi Highway । छत्रपती संभाजी नगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताचे तांडव घडले आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भिषण अपघात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २० ते २२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहेत. (Accident On Samriddhi Highway )
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या वैजापूर जवळील आगर सायगाव या ठिकाणी एक ट्रक थांबलेला असताना. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव खाजगी बसणे या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बस दूरवर जाऊन पलटी झाली आणि या अपघातात बसमधील जवळपास १२ प्रवासी जागीच ठार झाले तर २०ते २२ प्रवासी जखमी आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि तेथील स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील मालवाहू ट्रकच्या अनधिकृतपणे महामार्गावर थांबून आपघाताला निमंत्रण मिळत असल्याचा मुद्दा प्राकर्षाने पुढे आला आहे.