ब्रिटन राष्ट्रअध्यक्ष ऋषी सुनक यांच्यावर मराठी पत्रकाराचं पुस्तक ! पुस्तक ठरतेयं बेस्ट सेलर, अवघ्या काही क्षणांत मोठी विक्री ..!!
पुणे : लंडन येथे जाऊन पुण्यातील दै.पुढारीचे वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबाबत अनेक गोष्टी उलघडल्या आहेत. पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक सध्या बेस्ट सेलर ठरत आहे. ऋषी सुनक यांच्या यशस्वी कार्यकिर्दीवर हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांत मोठी विक्री झाली आहे.
पुस्तकातील ऋषी सुनक यांचे संदर्भ पाहता, अवघ्या दोनच दिवसांमध्ये 2000 प्रतींची दुसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. यामुळे यामध्ये अनेक गोष्टी उलघडल्या गेल्या असल्याने त्याला पसंती मिळत आहे.
युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल माध्यमांमुळे समोर आले आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत.
ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे. याबाबत अनेक सविस्तर माहिती यामध्ये दिली आहे.