मराठे जिंकले! विजयानंतर ओबीसीच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई : मराठ्यांच्या आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सगळ्याच मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे. आता फक्त जरांगे पाटील एका तासात हाती येणाऱ्या जीआरची वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांनी जवळपास आधी लढाई जिंकली आहे. या विजयावर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

या प्रतिक्रियेत बबनराव तायवाडे म्हणाले, मराठा आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करणार अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत. हे दोन्ही गॅजेट कशा पद्धतीने लागू करण्यात येणर आहेत, याबाबत सविस्तर माहिती आलेली नाही.तसेच या जीआरची अंमलबजावणी करणार काय तरतुदी असणार याबद्दल सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही त्यावर भाष्य करणार नाही असे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार जो ड्राफ्ट आंदोलनकर्त्यांना दाखवणार आहे.तो ड्राफ्ट आम्हाला पाठवून आमची सुद्धा संमती सरकारने घ्यावी अशी अपेक्षा, बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच यामध्ये असणाऱ्या तरतुदी समावेश केलाय, त्याने ओबीसीचा नुकसान होणार नाही हे स्पष्ट होऊ द्यावे,अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
