मराठ्यांचं वादळ मुंबईत जाणार! जरांगे फडणवीसांना भेटणार, राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन होणार…

जालना : आज मंत्री उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. येत्या 23 तारखेला जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील दोन वर्षांपासून जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगे यांना आश्वासन दिलं होतं, आता आश्वासनाची मुदत संपत आहे. यामुळे जरांगे पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली.
याबाबत येत्या 23 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्यासंर्दभात चर्चा करणार असल्याचं सामंत यांनी सांगितले. सरकारला दिलेली मुदत 30 एप्रिलला संपत आहे. त्यामुळं सरकारनं मागण्या मंजूर केल्या राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करूअसा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करावे असं जरांगे यांनी सांगितले आहे. उदय सामंत यांनी पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे जरांगे यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केली आहे. यावेळी अनेक गोष्टींवर चर्चा झाली. यामुळे आता आगामी काळात जरांगे मुंबईत आंदोलन करणार की नाही हे लवकरच समजेल.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे करत आहेत .मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी केलेलं उपोषण सोडताना सरकारनं मनोज रंगे यांना आश्वासन दिलं होतं मात्र आता आश्वासनाची मुदत संपत आहे. कुणीही नाराज असू द्या माझ्या भेटीसाठी आला तरी समाजाच्या प्रश्नावरच चर्चा करणार असल्याचे जरांगे म्हणाले. समाजाचे तीनही गॅजेटीयर लागू करा. कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या .कुणबी प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करा, असं जरांगे यांनी म्हटले आहे.