Maratha Reservation : मराठा आरक्षणाची ठिणगी सर्वत्र! नर्सरी व फुलांचे प्रसिद्ध गाव असलेल्या सोरतापवाडीकरांनी घातली सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदी!!


Maratha Reservation  उरुळी कांचन  : मराठा समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी नोकरी व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा संघटनांनी सुरू केलेल्या लढ्याला गावोगावी मोठा पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी चालढकल केल्याची संतप्त भावना आक्रमक मराठा समाजात असून या भावनेतूनच सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदी घालण्याचा निर्णयात सोरतापवाडी (ता.हवेली ) ग्रामस्थ सहभागी झाले असून नेत्यांना गाव बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. Maratha Reservation

मराठा समाजाच्या अनेक पिढ्या सुशिक्षित व कर्तृत्वान असूनही नोकरी व शिक्षणात आरक्षण नसल्याने मराठा समाजाला प्रशासनात व उच्चप्रस्थ पदावर काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत समाजात आहे. विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्याने समाजाच्या अनेक पिढ्या या पारंपारीक व्यवसायापलिकडे जात नसल्याची शोकांतिका समाजात आहे. आरक्षण मिळून समाजाची खालावत चाललेली सामाजिक घडी बसावी. या उद्देशाने आरक्षण या मूळ मुद्दासाठी संघर्ष उभा केलेल्या मराठा आरक्षणासाठी समाज एकवटण्याचा निर्णय सोरतापवाडी ग्रामस्थांनी घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास सर्वपक्षीय नेतेमंडळी जबाबदार असून या नेतेमंडळींना गाव बंदी करण्याचा राज्यव्यापी भूमिकेत सोरतापवाडी ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यासाठी सोरतापवाडी करांनी नेत्यांना गाव बंदी घातली आहे.या काळात कुठल्याही राजकीय नेत्यांनी गाव प्रवेक्ष केला तर त्यांना घेराव घालून समाज जाब विचारणार आहे. त्यासाठी ग्रामस्थ गावात फलक उभारुन निर्वाणीचा इशारा दिला आहे. Maratha Reservation

या निर्णयापूर्वी ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी दौरा करणाऱ्या व आरक्षणासाठी आंतरवाली-सराटी गावात उपोषणास बसलेल्या लढवय्या मनोज जरांगे -पाटील यांच्या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. आता हे आंदोलन प्रत्येक गावातून सुरू होण्यासाठी सोरतापवाडी ग्रामस्थांनी स्वतः च्या गावातून सुरुवात केली आहे.

सोरतापवाडीच्या सरपंच संध्या चौधरी व युवा नेते अमित चौधरी यांच्या आवाहनास ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र मधुकर चौधरी, राजेंद्र तानाजी चौधरी, संजय चौधरी, प्रवीण चोरघे, सोन्या लोणकर, भाऊसाहेब चौधरी, कैलास चोरघे, अमोल चौधरी, नरेंद्र कड, अजिंक्य चौधरी, सचिन चौधरी, बाळासाहेब चौधरी, नवनाथ आढाव, सनी चौधरी, प्रशांत चौधरी आदींसह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभागी घेऊन राजकीय नेत्यांवर गावबंदी घातली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!