Maratha Reservation : सरपंच असल्यापासून मराठा आरक्षणासाठी झटलो, पण आता…; पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी घेत माजी सरपंचाने स्वतःला संपवले…


Maratha Reservation पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारने तातडीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहेत.

एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन करत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी गेल्याचे समोर येत आहे. Maratha Reservation

पुण्यातील आळंदी येथे मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मराठा समाजाला आरक्षण तसेच मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथील व्यंकट ढोपरे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवल आहे.

पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा आज मृतदेह आढळला. नऱ्हे आंबेगाव येथून काल ते दर्शनासाठी आळंदीत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते तिथून निघाले आणि कुटुंबियांना घरातच एक चिट्टी सापडली. त्यातून त्यांनी आरक्षण मिळत नसल्याने टोकाच पाऊल उचलल्याचं स्पष्ठ झालं.

व्यंकट नर्सिंग ढोपरे (वय ६० वर्षे, मूळ रा उमरदरा, ता. शिरूर आनंदपाळ, जिल्हा लातूर, सध्या रा नऱ्हे आंबेगाव ) असे जीवन संपवलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो, तरी सरकार याला गांभीर्याने घेत नाही. तसेच २०१२ पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाच्या आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे.

ही चिठ्ठी पाहून कुटुंबियांना धक्का बसला आणि त्यांनी भोसरीत राहणाऱ्या जावयास याबाबत कळवण्यात आलं. तेव्हा आळंदीत त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यालगत त्यांची पिशवी, मोबाईल, गळ्यातील माळ, चप्पल आणि ज्ञानेश्वरीमधील काही कागद आढळली.

त्याच बंधाऱ्यात पोलीस आणि एनडीआरएफकडून शोध सुरू झाला. आज दुपारी तिथंच त्यांचा मृतदेह आढळला. त्यांना पोहायला येत असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःचे हात बांधून इंद्रायणी नदीत उडी घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालात यात आणखी स्पष्ठता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!