मराठा आरक्षण आंदोलन ; ‘जिंकलो रे राजे हो आपण, तुमच्या ताकदीवर’ : विजयानंतर जरांगेचे पहिले उद्गार

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला त्यानंतर सरकारने मागण्यांची दखल घेत मोठे निर्णय घेतले आहेत.राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेट लागू करणार असल्याचे सांगितले आहे. हा विजय मिळाल्यानंतर त्यांनी जिंकलो रे राजे हो आपण तुमच्या ताकदीवर असे उद्गार काढले.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जीआर दिला तर ९ वाजता मुंबई खाली होईल. नाचत नाचत पोरं गावाकडे जातील. तुम्ही थांबा म्हटलं तरी थांबणार नाही. तुम्ही जीआर द्या. आम्ही तुमच्या स्वागताला तयार राहू. तुम्ही इथेच बसून राहा आणि जीआर घेऊन या. सरकारला हा म्हणू का. ओके जिंकलो रे राजे हो आपण, तुमच्या ताकदीवर. आज कळालं गरिबांची ताकद किती मोठी आहे” असे मनोज जरांगे यांचे पहिले उद्गार होते.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती देखील दिली आहे. कोणत्या आहेत मागण्या जाणून घेऊया?

पहिली मागणी – हैदराबाद गॅझेट लागू होणार
दुसरी मागणी -सातारा संस्थांनचे गॅझेटही लागू होणार
तिसरी मागणी – मराठा आंदोलकांवरती सर्व केसेस मागे घेणार
चौथी मागणी- मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्याच्या वारसांना नोकरी
पाचवी मागणी – ग्रामपंचायत नोंदीचे रेकॉर्ड ठेवणार
सहावी मागणी – कुणबी मराठा एकच असल्याचा अभ्यास
सातवी मागणी – सगळे सोयऱ्यांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वेळ
