Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, वंशावळानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाली..
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आंतरवाली ते मुंबई पदयात्रा सोमवारी नगर जिल्ह्यात आहे.
रात्रीचा मुक्काम संपवून यात्रा पुढील प्रवासाला रवाना झाली. तसेच २६ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण देखील सुरू करणार आहेत. तसेच आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठे पाऊल उचलले असून वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका घेतली आहे.
राज्य सरकारकडून वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वंशावळ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.तहसिलदार व नायब तहसिलदार यांना वंशावळीनुसार प्रमाणपत्र वाटपाचे अधिकार दिले जाणार आहेत. Maratha Reservation
याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारकडून सतत आपण आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान जरांगे हे २६ जानेवारी रोजी हजारो मराठा बांधवांना सोबत घेऊन मुंबईत पोहचणार आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे जालना ते मुंबई असा मोर्चा काढत आहेत. शनिवारी २० जानेवारी सुरू झालेला त्यांचा मोर्चा आज २२ जानेवारी अहमदनगरमध्ये पोहोचला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारकडून सतत आपण आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे