मराठा आरक्षणाच्या जीआरनं नव्या वादाला ठिणगी; छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार


मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश येत राज्य सरकारने मंगळवारी जीआर काढला. आता या जीआर वरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या जीआरचे पडसाद आता आजच्या कॅबिनेट बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे.

आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपसमितीच्या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, सरकारसमोर नवे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. छगन भुजबळ यांनी प्री-कॅबिनेट बैठकीला उपस्थिती लावली. मात्र, कॅबिनेट बैठकीच्या आधीच त्यांनी सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले. भुजबळांच्या या पावित्र्याने चर्चांना उधाण आले आहे. ओबीसी समाजाचा सूर आक्रमक झाल्याने पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे यांचे उपोषण मंगळवारी संपले. राज्य सरकारने जरांगे यांच्या आठ पैकी 6 मागण्या मान्य केल्या. मराठा-कुणबी दाखल्याबाबत महत्त्वाचा निर्णय उपसमितीने घेतला. आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदान आणि परिसरात जोरदार आनंद साजरा केला. मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णय झाल्यानंतर आता ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे. त्यानंतर आता या जीआर ने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!