Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट, सभागृहात या दिवशी होणार चर्चा, चर्चेत मार्ग निघणार?

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी करण्यात येत होती.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ही माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. Maratha Reservation
उदय सामंत म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती चर्चा सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात होणार आहे.
मराठा समाजाच्या, आरक्षणाच्या निमित्ताने ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. मात्र, मनोज जरांगे यांनी जी पहिली मागणी केली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे.
त्याच्यावर काम सुरू असून, निजामकालीन ज्या काही नोंदी सापडत आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इम्पीरिकल डाटा गोळा करून आणि आयोगाला सांगून जमा झालेला इम्पीरिकल डाटा सुप्रीम कोर्टात मांडून मराठा समाज कसा मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारा आरक्षण आम्ही देणार असल्याचे उदय सामंत म्हणाले आहे.