Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरण! आता अजित पवारांच्या पोस्टरवर फासले काळे, बारामतीतच घडला प्रकार…


Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण सुरू केलं आहे. नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. नेत्यांची वाहने अडवली जात आहेत.

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या काही तरुणांनी उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. Maratha Reservation

बारामती- निरा रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरील बाजूस फोटो होता. संतप्त मराठा कार्यकर्त्यानी त्यास काळे फासले. दरम्यान घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलिस दाखल झाले. Maratha Reservation

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बारामती तालुक्यात आता परिस्थिती अधिकच संवेदनशील बनत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या रोषामुळे उपमुख्यमत्री अजित पवार यांना माळेगावचा दौरा रद्द करावा लागला होता. आता परिस्थिती अधिकच हाताबाहेर जावू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!