Manoj Jarange Patil : …तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीच! मनोज जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस अजून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.
मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे. २० फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारचे अधिवेशन आहे.
ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. नोदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आरक्षण टिकावं म्हणून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे.
सरकारने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमापत्र देण्यात येणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आज पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केलेले आरक्षण दिलं जाणार आहे. अहवाल कोर्टात टिकां म्हणून मागासवर्गीय अहवाल आलाय, तो याच आंदोलनामुळे झालं आहे. Manoj Jarange Patil
जरांगे पाटील म्हणाले, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडकयत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सग्यासोयऱ्याचा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असं जरांगेंनी म्हंटले आहे. मराठवाड्यातील सगळा मराठा कुणबी आहे. कुणबी नोंदी सापडल्या त्यांना द्यावेच लागेल, मात्र मागासवर्गीय अहवाल घेऊन ते आरक्षण देताला, मात्र ते चालणार नाही, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्या शिवाय कोणाला सोडणार नाही.
मागासवर्ग आयोगाचे पण राहुद्या, ज्यांना नकोय त्यांना जोरजबरदस्ती नाही. २० तारखे पर्यत अंमलबजावणी करा, अंतरवली सह सर्व गुन्हे मागे घ्या. २० तारखेपर्यंतच मी उपोषण करत असतो, सरकारने सरकारचे धोरण ठरवलं, मराठे मराठ्यांचे धोरण ठरवणार. मागासवर्गीय आयोग, सग्या सोयऱ्यांचे आणि कुणबी या सर्वच बाजूने मराठयाना आरक्षण मिळणार, असं जरांगेनी म्हंटले आहे.