Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचे ठरलं! सांगितला मुंबई जाण्याचा मार्ग, मुक्काम, जाण्याची तयारी, जाणून घ्या…


Manoj Jarange Patil  मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकरला दिलेला अल्टीमेटम संपलेला आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आंदोलन सुरु होण्यासाठी आता फक्त ५ दिवस शिल्लक आहेत. अशात या आंदोलनाची दिशा कशी असेल याबाबत जरांगेंनी माहिती दिली आहे. २० जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी बोलताना त्यांनी अंतरवाली ते मुंबई पायी जाण्यासाठी मुक्कामाचे टप्पे कोणते असतील याची माहिती त्यांनी दिली आहे.

आंदोलनाचा मार्ग असा असणार..

२०) जानेवारी पहिला मुक्काम- बीड, २१) जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर), २२) जानेवारी तिसरा मुक्काम- रांजणगाव (पुणे जिल्हा), २३) जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे), २४) जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा),२५) जानेवारी सहावा वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई), २६) जानेवारी सातवा मुक्काम आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल. ही आपली शेवटची लढाई आहे, असं जरांगे यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये ते दोन दिवस थांबणार असून पुण्यामध्ये मराठा समाज बांधवांचा आकडा एक करोड होणार आहे. त्याचबरोबर पुण्यावरून मुंबईमध्ये जाताना कोणीही व्यसन करायचे नाही.

तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे असे आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. Manoj Jarange Patil

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी शासनाकडून तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. २० तारखेला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यासाठी राज्य सरकारची या आठवड्यातच बैठक होणार आहे.

मुंबईतील नियोजन, वाहतूक, क्राउड मॅनेजमेंट, कायदा सुव्यवस्था संदर्भात शासनाचे अधिकारी माहिती घेऊन अहवाल तयार करणार आहेत. या आठवड्यातच होणाऱ्या कॅबिनेटमध्ये संबंधित माहितीचा अहवाल राज्य सरकारसमोर ठेवला जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!