Manoj Jarange Patil : आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार..


Manoj Jarange Patil  : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे. खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही, असं उत्तर आझाद मैदान पोलिसांनी आयोजकांना दिलं आहे. यामुळे जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणार नाही, आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, असा ठाम पवित्रा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? अशी चर्चा असतानाच त्यांनी आझाद मैदानात व्यासपीठ तयार असल्याचे सांगत त्याठिकाणीच आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

मनोज जरांगे यांनी सांगितले की, जनतेला त्रास नको, ते काम करत आहेत. मात्र आरक्षणावर मालकांनीच (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री) तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही तोडगा काढण्यास तयार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. Manoj Jarange Patil

मालक आल्यास आम्ही चर्चा करु, पण ते नाही आल्यास चर्चा कशी करणार? सगेसोयऱ्यांचा आदेश काढला आहे का? असे सांगत त्यांनी मागण्यांवर सरकारकडून निर्णय झाला नसल्याचे सांगितले. आम्हाला परवानगी नाकारलेली नाही. कोर्टाची नोटीस आहे म्हणून सही केली.

मात्र, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दगाफटका होऊ नये सावध राहिलेलं बरं. त्यामुळे कोणी उपद्रव केल्यास पोलिसांच्या ताब्यात द्या म्हणून सांगितलं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!