Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत खालावली, डॉक्टरांकडून तपासणी सुरू…


Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मोठा लढा देत आहेत. आरक्षणाबाबत सध्या गावागावात त्यांचे दौरे सुरू आहेत. अशात जरांगेंच्या तब्येतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे बातमी समोर आली आहे.

धाराशिव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा संपताच त्यांना शुगर कमी असल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यांची शुगर ७६ वर पोहोचल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. Manoj Jarange Patil

पुढील पाच दिवस मनोज जरांगे पाटील यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी स्टेजवर त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच विश्रांती करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जरांगे आता दौरा सोडून आराम करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना आरामाची गरज असल्याचे देखील डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना पुढील पाच दिवस आराम करावा लागणार अशी प्रतिक्रिया त्यांच्या चेकअप नंतर डॉक्टरांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!