Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा खालावली, पहिल्यांदाच सुरू झाला ‘हा’ त्रास, डॉक्टरांकडून उपचार सुरू, मराठा समाज चिंतेत….

Manoj Jarange Patil : पुन्हा एकदा मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा जीव भांड्यात पडला आहे. रात्री जरांगे पाटील यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
शुक्रवारी रात्री मनोज जरांगे यांना अचानक घाम आला आणि छातीत वेदना होऊ लागल्या त्यामुळे डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करावे लागले. डॉक्टरांनी सलाईन लावून उपचार केल्यानंतर जरांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सध्या त्यांची तब्येत बरी असून डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. चार दिवसांच्या उपचारानंतर ते शुक्रवारी अंतरवाली सराटीमध्ये आले, मात्र त्यानंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. अंतरवालीमध्येच त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. Manoj Jarange Patil
रात्रीच त्यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली आहे, असे डॉक्टरांचं मत आहे. डॉक्टरांनी हे गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान त्यांच्या छातीत कधीही दुखत नव्हतं. सरकारकडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे, तरीही ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. त्यांनी नुकतंच मराठा समाजाच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं असले तरी उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.