Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, मराठा समाज आक्रमक, नेमकं घडलं काय?


Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा अररक्षण हा मुद्दा पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जरांगे पाटलांसाठी हा सर्वात मोठा धक्का समजला जात आहे.

मराठवाड्यात तब्बल १०४१ जणांवर आणि बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद केली आहे. मनोज जरांगे यांच्यावर शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. Manoj Jarange Patil

या आरोपांवरून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. आंदोलनकर्त्यांना कायदा हातात घेता येणार नसून सरकारने संयम ठेवलेला आहे. सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका’, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना दिला आहे.

मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित..

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं ते मराठा बांधवांना म्हणाले आहेत. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!