बीड सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांचं मोठे विधान, म्हणाले….


बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटेनचा सर्व स्तरावरुन निषेध केला जात आहे.

तसेच ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातल्या दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील राजकीय वर्तुळातील काही नेत्यांकडून केली जात असताना देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भरसभेतून थेट जाहीरपणे इशारा दिला.

आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे पाटील म्हणाले, जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्याने फिरू देणार नाही.

आमचा एक भाऊ गेला तो आम्ही सहन केला. पण आता जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढं त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो, बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसून मारायचं, असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!