उपोषणाआधीच मनोज जरांगेंचा सरकारला दणका; केली मोठी मागणी, थेट दिलं चॅलेंज


मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या उपोषणाकडे राज्याचं लक्ष लागलं असतानाच, त्याआधी जरांगे यांनी एक मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जात पडताळणी समिती बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

‘देशात कुठेही जात पडताळणी समिती नाही, मग फक्त महाराष्ट्रातच ती कशासाठी?’ असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. जात प्रमाणपत्र दिल्यानंतर पुन्हा जात पडताळणी करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी केला.

दरम्यान, सरकारवर टीका करताना जरांगे म्हणाले की, शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत आणि गोरगरिबांनाही मदत मिळत नाही. मराठा समाजाला मोठं होऊ दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठा समाजाने ही लढाई समजून घ्यावी आणि आपल्या मुलांना अधिकारी बनवण्यावर भर द्यावा, असं आवाहनही जरांगे यांनी केलं. ‘तुमचे लेकरं अधिकारी झाले तर तुम्हाला अडचणी येणार नाहीत. आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून देऊ,’ असं ते म्हणाले.

तसेच, इतर समाजांचे SEBC आरक्षण टिकले पाहिजे, ही मागणी योग्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, पुरावे असूनही पुन्हा पुन्हा छाननी केली जात असल्याचा आरोप करत जात पडताळणी समितीच बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!