माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अखेर ठरला? अजित पवारांसोबत झाली अंतिम बैठक, नेमकं काय घडलं?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळातील खांदेपालटाविषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार ‘सेल्फ गोल’ करत असल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.

माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याबाबत आज एक महत्त्वाची घडामोड पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील बैठक नुकतीच पार पडली. या भेटीत कोकाटे यांनी अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, या बैठकीत माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून किंवा घडलेल्या काही वादग्रस्त घटनांवरून अजित पवारांकडे आपली माफी मागितली. तसेच, भविष्यात अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत, असे ठोस आश्वासन दिले आहे.

त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यापूर्वी अशी चर्चा होती की, माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवलं जाण्याची जाण्याची शक्यता कमी असली तरी, त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाऊ शकते.

मात्र या बैठकीनंतर लगेचच अजित पवारांच्या दालनात ‘प्री-कॅबिनेट’ बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, कोकाटे यांच्या भवितव्याबाबतचा सर्वस्वी निर्णय आता अजित पवार जाहीर करतील, असे स्पष्ट झाले आहे. अजित पवार हे त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे, कोकाटे यांच्यावरील आरोपांबाबत आणि त्यांच्या माफीनंतर अजित पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!