Malegaon Sugar Factory : अजित पवार मराठा समाजाचा निर्णय झुगारून माळेगावमध्ये येणार? मोळी पूजनासाठी माळेगाव कारखान्यावर पोलीस बंदोबस्तात वाढ..


Malegaon Sugar Factory बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येऊ न देण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. यामुळे वातावरण तापले आहे. यामुळे आज याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Malegaon Sugar Factory

उपमुख्यमंत्री अजित पवारांना माळेगाव साखर कारखान्यात मोळी टाकू देणार नसल्याचा निर्धार मराठा आंदोलकांनी केला आहे. यासंदर्भात माळेगाव कारखान्याचं संचालक मंडळ आणि मराठा आंदोलकांची बैठक निष्फळ ठरली आहे. Malegaon Sugar Factory

मराठा आंदोलकांनी अजित पवारांशी कोणतीही चर्चा करणार नसून त्यांना मोळी पूजनही करू देणार नसल्याचं म्हटलंय. माळेगांव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाने या कार्यक्रमाला विरोध केला आहे. राजकीय व्यक्तींना सर्वत्र गावबंदी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता सर्व मराठा समाज हा एक झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!