Makar Sankranti 2024 : पतंग उडवणे जीवावर बेतलं! घराच्या छतावरून पडून एकजण जागीच ठार..


Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत निमित्त राज्यभरात युवा वर्गात पतंग उडविण्याचा उत्साह दिसून आला. पतंगाेत्सवात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात काही दुर्देवी घटना घडल्या. पतंग पकडण्याच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर येथे भानापेठ वॉर्ड येथे ही घटना घडली आहे.

आनंद वासाडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आनंद वासाडे हे त्यांच्या घराच्या स्लॅबवर हाेते. त्यावेळी त्यांना एक पतंग तुटलेली दिसली. ते ही पतंग पकडण्यासाठी पुढे गेले. पण पतंग पकडण्याच्या नादात त्यांचा स्लॅबवरून तोल गेला आणि ते खाली पडले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. Makar Sankranti 2024

त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नागपूर शहरातील विविध भागात प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे १५ नागरिकांसह पशू पक्षी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. काही जखमी पक्ष्यांवर नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये उपचार सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!