सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी कारवाई, थेट मध्यप्रदेशातून एकाला अटक, महत्वाची माहिती आली समोर..

मुंबई : सैफ अली खान हल्ला प्रकरण गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास सैफच्या घरात शिरून एका व्यक्तीने त्याच्यावर चाकूचे वार केले. ज्यामध्ये अभिनेता गंभीर जखमी झाला. चाकूचे सपासप सहा वार करत आरोपीने सैफवर जीवघेणा हल्ला केला.
त्यानंतर अभिनेत्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात हलविण्यात आलं. सैफवर झालेल्या या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे दिपक कानोजिया याला मध्यप्रदेश मधून ताब्यात घेतलं आहे.
छत्तीसगड मध्यप्रदेश बॉर्डर वर असलेल्या दुर्ग येथून पोलिसांनी या संशयित आरोपीला उचललं आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणात एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याची कसून चौकशी सुरू असताना आता आणखी एक जण मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, या आरोपीला कसे पकडले याबाबत स्वतः डीजी मनोज यादव यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, मुंबई पोलिस या संशयिताचं लोकेशन ट्रॅक करत होती. त्यांना माहिती मिळाली की हा इसम ट्रेनमध्ये असून ही ट्रेन दुर्ग आणि राजनंद गावाच्या आजूबाजूला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती मध्य प्रदेश पोलिसांना दिली आहे.