मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर मोठा अपघात, 15 वर्षीय मुलीचा मृत्यू, पाच जखमी


पुणे : पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आता येथील भीषण अपघातात एका १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर एकाच कुटुंबातले पाच जण जखमी झाले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आयशर टेम्पोला कारने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला आहे.
मुंबईहून पुण्याला येत असताना मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ अपघात झाला.

अपघातात १५ वर्षीय सारा कुरेशी हिचा मृत्यू झाला. तर तीन पुरुष आणि दोन महिला अपघातात जखमी झाले आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

या कारमधून सहा जण प्रवास करत होते. अपघातानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग पोलीस आणि राणी एम्ब्युलन्सने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!