Mahesh Landge : बदलापूर सारखी घटना इथे घडली तर….; आमदार महेश लांडगे संतापले


Mahesh Landge : बदलापूरमधील शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सगळे हादरले आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. तसेच या घटनेवरुन राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

त्यावरुन, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. कारण, विरोधकांकडून या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत, तर राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, लाडकी बहीण योजना नको तर सुरक्षीत बहीण योजनेची महाराष्ट्राला गरज असल्याचं विरोधक म्हणत आहेत.

याप्रकणी आता आमदार महेश लांडगे यांनी देखील भाष्य केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये “भावासाठी लाडक्या बहिणीकडून मायेची राखी” या कार्यक्रमासाठी आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित बहिणींना कायम पाठीशी उभे राहण्याचे वचन दिले. Mahesh Landge

या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की बदलापूर मध्ये जो काही प्रताप घडला तो प्रताप माझ्या पिंपरी चिंचवड शहरात घडू देणार नाही, घडल्यास त्याला तिथंच ठेचून काढणार हे नक्की. असे ते यावेळी म्हणाले आहे.

ते पुढे म्हणाले, “कदाचित तुम्हा भगिनींचे प्रेम मला मिळावे यासाठी आम्हा भावंडांना सख्खी बहीण नाही. परंतु संकटकाळी कधीही हाक द्या हा भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा राहील.” असं महेश लांडगे म्हणाले आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी त्यांनी बदलापूरच्या घटनेवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘बदलापूरमध्ये जे घडलं ते माझ्या पिंपरी चिंचवड शहरात घडू देणार नाही. घडल्यास मी तुम्हाला शब्द देतो, अशा नराधमांना ठेचून मारेल. असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!