Mahendra More : मोठी बातमी! भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, घटनेने उडाली खळबळ…


Mahendra More : कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिवसेना शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना ताजी असताना जळगावातून गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव मध्ये भाजपच्या एका माजी नगरसेवकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

महेंद्र उर्फ बाळू मोरे असे माजी नगरसेवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पाच तरुण तोंडाला रुमाल बांधून आले आणि या पाचही आरोपींच्या हातामध्ये पिस्तूल होते. ते पाचही आरोपी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी माजी नगरसेवकावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. Mahendra More

संबंधित घटनेचा गोळीबाराचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला नाही, पण आरोपी कारमधून बाहेर उतरताना. हातात बंदूक घेऊन नगरसेवकाच्या कार्यालयात शिरल्याचे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगावच्या चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अज्ञात पाच आरोपी हे एका कारमधून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ते एका पाठोपाठ पाच जण हातात बंदुका घेऊन आले. त्यानंतर त्यांनी योग्य संधी साधत मोरे यांच्यावर कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी मोरेंवर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी तिथून धूम ठोकली.

या गोळीबारात बाळू मोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या पोलीस आरोपींच्या शोधात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!