Mahayuti Government : मोठी बातमी! महायुतीला स्पष्ठ बहुमत, आता सत्ता स्थापनेचा मुहूर्तही ठरला…


Mahayuti Government : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून महायुती सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. राज्यात भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेने दमदार कामगिरी केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठे यश मिळवलं आहे.

आता, राज्यात महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त २५ नोव्हेंबर ठरवण्यात आला आहे. यामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोण असेल, यावर अंतिम निर्णय होणार आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, २५ नोव्हेंबर रोजी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते एकत्र येऊन बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेणार आहेत. यानंतर, २६ नोव्हेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होईल, अशी माहिती समोर आली आहे. Mahayuti Government

भाजपने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली असून, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि आता फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच वक्तव्य केले आहे. प्रविण दरेकर यांनी म्हटले, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असावे, अशी आमची इच्छा आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत घटक पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!