कोकणात महाविकास आघाडीला धक्का ; भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी…!

नवी मुंबई : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे .या विजयामुळे भाजपच्या गटात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल २२ हजार मते मिळाली होती.
दरम्यान कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. महेंद्र कल्याणकर हे काम पाहत होते. २८ टेबलवर मतमोजणी झाली. पाच जिल्ह्यांतील शिक्षकांनी या निवडणुकीत ९१ टक्क्यांपर्यंत मतदान केले होते.