Maharashtra Weather Update : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट, कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या…

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परतीच्या पावसाची तीव्रता कमी झाली आहे. आता ऑक्टोबरमध्येही पाऊस धुमाकूळ घालण्याची चिन्हे आहेत. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
पुणे जिल्ह्याचा घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु पुणे शहरात आज ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुण्यात २५ अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
सातारा जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, महाबळेश्वर, खटाव, माण या ठिकाणी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात आज २६ अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
सांगली जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून मिरज, विटा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर जत, आटपाडीमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सांगलीत २८ अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. Maharashtra Weather Update
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर मध्ये २६ अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण भागात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. उत्तर व दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी आज आभाळ राहणार असून तूरळक पावसाची शक्यता असेल. तर सोलापूर मध्ये आज २७ अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
दरम्यान, राज्यभर पावसाने ब्रेक घेतला असला तरी देखील पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.