Maharashtra Weather : राज्यात परतीचा पाऊस जोरदार बरसणार!! पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता, ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी…
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय. यंदा मान्सून अगदी वेळेत आणि दमदार हजर झाला होता, तर आता जाता जाताही संपूर्ण राज्याला झोडपतोय.
अशातच आता राज्यात पुढील ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भासह अन्य काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. तो आता गुजरातमधील कच्छपर्यंत पोहोचला आहे. Maharashtra Weather
त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा २४ तासांत तयार होणार आहे. याच्या परिणामामुळे राज्यातील पाऊस वाढणार असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस पुढील तीन ते चार दिवस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात देखील पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे.
यलो अलर्ट..
पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
ऑरेंज अलर्ट..
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड.
आगामी तीन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस..
पुणे शहर, परिसरासह पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, सोमवारी सायकांळी विजांचा कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरात गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन जाणवत आहे, उकाडाही वाढला होता.