Maharashtra TET : अखेर ठरलं! टीईटी परीक्षा ‘या’ रोजी होणार, सुधारित वेळापत्रक जाहीर…


Maharashtra TET : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तयारी युद्ध पातळीवर केली आहे. तसेच येत्या १० नोव्हेंबर २०२४ रोजी टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेसाठी तब्बल ३ लाख ५३ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सुमारे तीन वर्षानंतर टीईटी परीक्षा होत असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत. राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) येत्या १० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यात आयोजित केले जाणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- दोन दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. Maharashtra TET

दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर TET परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे व सुरळीतपणे घेण्याच्या दृष्टीने राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाईन टीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात विचार केला होता. परंतु,परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विविध भाषेमध्ये तयार करण्यात अडचणी येत असल्याने टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला.

त्यादृष्टीने आता तयारी करण्यात आली आहे. राज्यातील १०२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. विविध केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी यांच्या बैठका परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जात असून परीक्षेच्या नियोजनाची जय्यत तयारी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!