Maharashtra School Time Change : मोठी बातमी! मुलांच्या शाळांची वेळ बदलली, जाणून घ्या आता किती वाजता भरणार शाळा…


Maharashtra School Time Change : महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहेत. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे.

सध्या सर्वांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे जर पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या होत्या.

येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. Maharashtra School Time Change

महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. मात्र माध्यमिक शाळा सकाळी भराव्यात आणि प्राथमिक शाळा दुपारी भराव्यात अशा सूचना शिक्षण तज्ञांकडून येत होत्या.

याचे कारण असे की, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय १२ वर्षाच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय ३ ते १० वर्षे असते. याबाबत राज्यपाल रमेश बैस यांनी देखील सूचना केली आहे.

यामुळे आता दुसरीपर्यंत प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे देखील दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

त्याचबरोबर दीपक केसरकर म्हणाले राज्यपालांनी जे मत व्यक्त केले होते त्याबाबत सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!