Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा एकदा गारपीट! पुण्यासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान, ‘या’ ठिकाणी पाऊस देखील बरसला, जाणून घ्या…

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड तर नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसासह गारपीट झाली. नाशिकच्या ग्रामीण भागात देखील गारपीटीसह पाऊस झाला आहे

तसेच येत्या तीन तासांत देखील काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Rain Update
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासोबत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे यासह मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, जालना तर विदर्भात बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे.
