Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी?, कोणकोणत्या पक्षांचा या आघाडीत समावेश, जाणून घ्या…


Maharashtra Politics : राज्याचा राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर होण्याआधी पक्षांकडून मोठी तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. पक्षांच्या बैठका, जागावाटप, सभा, गाठीभेटी यांना वेग आला आहे.

असे असतानाच आता राज्यात छोट्या पक्षांनी एकत्रित येत तिसऱ्या आघाडीसाठीच्या हालचाली सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे. आज याबाबची महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी बदलले चित्र आणि बसलेला मोठा फटका पाहता राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली असतानाच आता विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष देखील एकत्रित येत राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याची चिन्ह दिसत आहे. ही तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी आज बैठक होत आहे. Maharashtra Politics

आज पुण्यात पार पडणाऱ्या तिसऱ्या आघाडीची महत्वाची बैठकीमध्ये स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे बच्चू कडू, डॅा.बाबासाहेब आंबेडकारांचे पंतु राजरत्न आंबेडकर आणि इतर घटक पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकींच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक, शेतकरी घटकपक्षांना एकत्रित घेवून आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!