Maharashtra Politics : ठाकरेंना पुन्हा एकदा धनुष्यबाण मिळणार? आज होणार निर्णय, राज्याचे लागले लक्ष…

Maharashtra Politics नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणासाठी Maharashtra Politics आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. Maharashtra Politics
खरी शिवसेना नेमकी कोणाची एकनाथ शिंदे (Eknath Shinde) की उद्धव ठाकरे? (Uddhav Thackeray) धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाचे? याबाबत आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोग आणि १६ आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल केल्या होत्या. ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी देखील १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
दरम्यान, याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध देखील ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही आज म्हणजेच सोमवारीच सुनावणी होणार आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी सुनावणी झाली नव्हती. सुनावणी होणार असल्याने संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. Maharashtra Politics