Maharashtra Politics : ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणात अडकवा, अनिल देशमुख यांना फडणवीसांकडून खास ऑफर, धक्कादायक माहिती आली समोर…

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गुटखा व्यापाऱ्यांवर कोट्यवधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे.

तसेच, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव होता, असा धक्कादायक दावाही आज श्याम मानव यांनी नागपुरात केला आहे.

श्याम मानव यांच्या एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक अहवालांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांनी केलेल्या सर्व आरोपांत पूर्णपणे तथ्य असल्याचा दावा केला आहे.

अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटका व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी मागणी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणांकडे द्या, असं सांगण्यासाठी अनिल देशमुखांवर काही लोकांकडून सातत्यानं दबाव टाकला जात होता. Maharashtra Politics
तसेच, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांवर कसा दबाव होता, असे धक्कादायक दावे श्याम मानव यांनी नागपुरात केले आहेत.
अनिल देशमुखानी तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावं विविध खोट्या प्रकरणात घेतली, तर तुम्हाला ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ, अशी थेट ऑफरच अनिल देशमुखांना देण्यात आल्याचा धक्कादायक दावाही श्याम मानव यांनी केला आहे. यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.
