Maharashtra Politics : मोठी बातमी! शरद पवार यांच्या पक्षाला मिळालं नवं नाव, निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ नावाला मान्यता..
Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शरद पवार गटाकडून तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या नावाला मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत मर्यादीत असणार आहे.
शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी एक नाव निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला देण्यात आलेलं नवं नाव हे येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. येत्या २७ फेब्रुवारीला राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर शरद पवार गटाला पुन्हा पक्षाच्या नावासाठी तीन नावांचा प्रस्ताव पाठवावा लागेल. Maharashtra Politics
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव देताना एक दिलासा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव मिळालं आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाच्या नावातही राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अबाधित असणार आहे. फक्त या नावापुढे शरदचंद्र पवार असं जोडण्यात आलं आहे.